मुंबई | राज्यात 7-8 सप्टेंबर या दोन दिवसांत पावसाळी अधिवेशन भरवण्यात आलं होतं. मंगळवारी हे अधिवेशन संपलं. तर अधिवेशनाच्या कामकाजानंतर नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळात दिलेल्या भाषणावरून नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. नारायण राणे म्हणाले, राज्यातील कोणत्याही गावाचा सरपंच मुख्यमंत्र्यापेक्षा चांगला बोलला असता. त्याने देखील संसदीय परंपरेला तसंच महाराष्ट्राला शोभेल असं भाषण केलं असतं.”
नारायण राणे पुढे म्हणाले, राज्यातील कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्दे उपस्थित केला मात्र त्यांच्या एकाही मुद्द्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं नाही. दोन दिवसांच्या अधिवेशनात सत्तारूढ पक्षाच्या प्रतिनिधींनी गोंधळ घातल्याने अनेक विधेयकं चर्चेविनाच मंजूर केली गेली. नियतीने भविष्यात कधी अधिवेशन घेण्याची वेळ आलीच, तर पुढचं अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्यावं, तास दोन तासांचं…”
“त्याचप्रमाणे सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणामधून आता नवीन गोष्टी बाहेर येताना दिसतायत. या सर्व गोष्टींवर लक्ष हटावं यासाठी धमकीचे फोन आल्याचं सांगण्यात,” येत असल्याचा आरोपंही राणे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने केला दोन लाखांचा टप्पा पार!
‘त्यासाठी माझा इतिहास पाहा’; पिंपरी-चिंचवडचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गुन्हेगारांना ठणकावलं
राज्याच्या इतिहासातील आजचा दिवस हा काळा दिवस- चंद्रकांत पाटील
‘जे पेराल तेच उगवेल’; रियाच्या अटकेवर शेखर सुमनची प्रतिक्रिया
तुम्ही कंगणाचं ऑफिस तोडू शकता, हिंमत नाही- गीता फोगट