Top News विधानसभा निवडणूक 2019

भाजप क्लीन बोल्ड झालाय, मात्र हे स्वीकारायला त्यांना वेळ लागेल- नवाब मलिक

मुंबई | क्रिकेट आणि राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप क्लीन बोल्ड झाला आहे, मात्र हे स्वीकारायला त्यांना वेळ लागेल, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.

क्रिकेटप्रमाणे राजकारणात काहीही होऊ शकतं हे आम्ही अमान्य करीत नाही. मात्र, क्रिकेटमध्ये जसा एखादा क्रिकेटपटू क्लीन बोल्ड होतो त्याप्रमाणे जनतेनं भाजपला क्लीन बोल्ड केलं आहे. हे भाजपनं स्वीकारावं, असं मलिक म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणतात भाजपचंच सरकार येईल. मग जेव्हा राज्यपालांनी त्यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं त्यावेळी त्यांनी सत्ता का स्थापन केली नाही. कोणतंही सरकार 145 आमदारांशिवाय स्थापन होऊ शकत नाही, असंही मलिक म्हणाले आहेत.

मलिकांनी यावेळी फडणवीसांवर टीका केली. फडणवीसांना माहित आहे की आपलं सरकार येणार नाही, मात्र कार्यकर्त्यांचं सात्वन करण्यासाठी भाजपचंच सरकार येणार असं वक्तव्य ते करत आहेत, असं ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या