बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समीर वानखेडेंच्या ‘त्या’ दाढीवाल्या मित्राचा नवाब मलिकांनी केला खुलासा

मुंबई | आर्यन खानचा जामीन मंजूर झाल्यानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज आणखी एक पत्रकार परिषद घेतली आहे. काल आर्यन खानला बेल मिळताच मलिकांनी ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’, असं ट्विट करत सुचक इशारा दिला होता. त्यानंतर मलिकांनी आज पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर पुन्हा निशाणा साधला आहे. नवाब मलिकांनी वानखेडेंच्या दाढीवाल्या मित्राचा खुलासा केला आहे.

वानखेडेंचा दाढीवाला ड्रग्ज माफिया मित्रही त्या रात्री क्रुझवर असल्याचा दावा मलिकांनी केला होता. तर आजच्या पत्रकार परिषदेत मलिकांनी त्या दाढीवाल्या व्यक्तीचं नाव जाहीर केलं आहे. त्या व्यक्तीचं नाव काशिफ खान असून ते फॅशन टीव्हीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर ते फॅशनच्या नावाखाली पॉर्नचा धंदा करत असल्याचा आरोपही नवाब मलिकांनी केला आहे.

काशिफ खान हा एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आहे. तर काशिफ खानच्या नावावर देशात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो समीर वानखेडेचा मित्र आहे. त्यामुळेच वानखेडेंनी त्यावर होणारी कारवाई रोखली असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे. काशिफ खानची गुन्हेगारी पार्श्र्वभूमी असून तो तिहार तुरूंगात कैद होता. पण वानखेडेंनी कोणतीही कारवाई न करता सोडून दिलं असल्याचा गौप्यस्फोटही मलिकांनी केला आहे.

काशिफ खान आणि त्याची प्रेयसी कॉर्डेलिया क्रुझवर उपस्थित होते आणि त्याची प्रेयसी हातात गन घेऊन नाचत असल्याचा आरोप मलिकांनी केला होता. तरीही एनसीबी या काशिफ खानवर कारवाई का करत नाही?, असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला आहे.  समीर वानखेडेंचा हा दाढीवाला मित्र क्रुझवर उपस्थित होता, पण त्याची स्कॅनिंगही केली गेली नाही. सापळा रचून लोकांना फसवलं असल्याचा आरोपही मलिकांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

आता कोरोनानर मात करण्यासाठी कॅप्सुलनं होणार उपचार

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट पण मृतांच्या आकड्यात वाढ, वाचा आकडेवारी

“…आणि दुर्दैवाने हा महाराष्ट्र मंत्रिमंडळात कौशल्य विकास मंत्री आहे”

‘त्या’ ट्विटवर नवाब मलिकांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

दिवाळीमध्ये स्कीनला द्या आणखी ग्लो, करा ‘हे’ घरगुती उपाय

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More