‘अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद…’; राष्ट्रवादीची मनसेवर खोचक शब्दात टीका
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा तात्पूरता स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या पायावर पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रिया होणार असल्याने हा दौरा रद्द करण्यात आला.
राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत दौरा रद्द झाल्याचं सांगितलं. तर 22 मे रोजी पुणे दौऱ्यात यावर सविस्तर बोलू, असंही राज ठाकरे म्हणाले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सडकून टीका केली आहे.
तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच…, अशा खोचक शब्दात राष्ट्रवादीने टीका केली आहे.
दरम्यान, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अयोध्या दौरा स्थगित झाल्यावरून उलट सुलट चर्चा सुरू असताना राज ठाकरे 22 मे रोजी पुण्यात सभा घेत यावर भाष्य करणार आहेत.
तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे.
सविस्तर बोलूच…@mnsadhikrut #Ayodhya #अयोध्या pic.twitter.com/2I3iI7Kge0— NCP (@NCPspeaks) May 20, 2022
थोडक्यात बातम्या-
‘अयोध्येत जाऊ तेव्हा संजय राऊतांना सोबत घेऊन जाऊ’; मनसेनं डिवचलं
अयोध्या दौरा स्थगित होताच राज ठाकरेंच्या तब्येतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
सर्वात मोठी बातमी! राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित
बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ; लालू प्रसादांच्या घरी सकाळी सकाळीच…
युक्रेनमधून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर; शेकडो सैनिकांची रशियापुढे शरणागती
Comments are closed.