बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! महाराष्ट्रात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर; ‘या’ नियमांचं करावं लागणार पालन

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात वाढत्या रूग्णसंख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनसह इतर अनेक निर्बंध लागू केले आहेत.

त्यातच आता महाराष्ट्रात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेने महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल प्रवासादरम्यान जवळ बाळगणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

यापूर्वीच्या आदेशानुसार, केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून येणाऱ्या व्यक्तींना कोरोना चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. परंतु, आता देशातील कोणत्याही कोपर्‍यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाला निगेटिव्ह कोरोना चाचणी अहवाल जवळ बाळगणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

48 तासापूर्वी RT-PCR चाचणी अहवाल केलेला पाहिजे आणि त्यानंतरच सदरील व्यक्तीने रेल्वेने प्रवास करावा, असं महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं आहे. लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांना या नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे प्रशासनाला या सूचनांचे पालन होत आहे की नाही, हे पाहण्यासाठीच्या सुचना सरकारतर्फे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत महाराष्ट्रात निगेटिव्ह कोरोना चाचणी अहवाल असेल तरच प्रवेश करता येणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“खतांच्या दरवाढीबद्दल तक्रार करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोदींचे मनापासून आभार मानावेत”

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे आगेकुच; सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

आनंदाची बातमी! पुण्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

महाराष्ट्रातील ‘या’ शहराला कोरोनातून मोठा दिलासा; मृत्यूचं प्रमाण कमी होऊन बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

हा भेदभाव का?, दुसऱ्या राज्यांमधील जनतेच्या प्रति आपली जबाबदारी नाही का?- पृथ्वीराज चव्हाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More