Top News महाराष्ट्र मुंबई

“देशात एकच राज्यपाल आहेत आणि तेच सर्व निर्णय घेतात, असं या रामाला वाटत असावं”

मुंबई | भाजप नेते राम कदम यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत बंगालमधे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावर पत्रकार निखील वागळे यांनी टीका केली आहे.

देशात एकच राज्यपाल आहेत आणि तेच सर्व निर्णय घेतात, असं या रामाला वाटत असावं!, असं निखील वागळे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात वागळेंनी ट्विट केलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची सुरक्षा करण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जावी यासाठी आम्ही राज्यपालांच्या भेटीला चाललो आहोत. आमची मागणी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवावी, असं राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, राम कदम यांनी राज्यपालांची भेट घेण्याअगोदर खारघरमध्ये त्यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमधील नागरिकांना घेऊन काळे झेंडे दाखवत ममता सरकारचा निषेध केला. त्यानंतर नागिकांनी ममता हटाव बंगाल बचाव, अशा घोषणा दिल्या होत्या.

 

 

थोडक्यात बातम्या-

‘हे सत्ताधारी आहेत की गुंडांची फौज?’; शिवसेना नेत्याने दिलेल्या धमकीवर भाजपचा सरकारवर निशाणा

शेतकऱ्यांचा अवमान करणारे दानवे हे येडपट आणि भैताड- विजय वडेट्टीवार

‘जेव्हा एका स्त्रीचे…’; अमृता फडणवीसांनी सांगितलं त्या ट्रोल होण्याचं कारण

नाशिकचा पुढचा महापौर आमचाच असेल- संजय राऊत

“…म्हणून शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं, अशी माझी मनापासून इच्छा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या