महाराष्ट्र मुंबई

“पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल, तर तो अजित पवारांनीच”

मुंबई | पहाटेच्या शपथविधीवरून शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला टोला लगावला. शिवसेनेनं केलेल्या टीकेनंतर निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत शिवसेनेला उत्तर दिलं.

निलेश राणे यांनी अजित पवार यांनी केलेल्या बंडाचा उल्लेख करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेना नेहमी पहाटेच्या भाजप-राष्ट्रवादीच्या शपथविधीवर टीका करते. अजित पवार हे पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?, असा सवाल निलेश राणेंनी केलाय.

अजित पवारांजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच केला, असं उत्तर निलेश राणे यांनी शिवसेनेला दिलं आहे.

बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते, पण त्यांचे काहीच चालले नाही. फडणवीसांचे सरकार कोसळले व महाविकास आघाडीचे सरकार यायचे ते आलेच. त्यामुळे या मंडळींचे मन खट्टू झाले, असं म्हणत शिवसेनेनं काही पोलीस अधिकाऱ्यांना टोला लगावला होता.

 

महत्वाच्या बातम्या-

मराठा समाज आक्रमक; आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूरात आंदोलक रस्त्यावर

मोदी सरकार पबजीवरील बॅन हटवणार?; जिओ मोठा करार करण्याच्या तयारीत

“पुण्यातील कंन्टेमेंंट झोनमधील निर्बंध अधिक कडक करणार”

राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई

“जो शेतकरी जमिनीतून सोनं उगवतो, त्याच्या डोळ्यात मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणतंय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या