मनोरंजन

सेलिब्रेटींच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच; आता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं केली आत्महत्या

मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनं देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र चित्रपटसृष्टीशी संबंधीत व्यक्तींच्या आत्महत्येचं सत्र अद्याप सुरूच असल्याचं पहायला मिळतंय. सुशांत सिंह, समीर शर्मा यानंतर आता प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकनंही आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अनुपमाने आपल्या दहिसर येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याचं 4 दिवसानंतर उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनुपमाने आत्महत्या करण्याआधी फेसबुक लाईव्ह करून चाहत्यांशी संवादही साधला होता. या लाईव्हमध्ये अनुपमानं आपल्याला नक्की कशाचा त्रास होतोय, याची माहिती दिली होती.

पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये अनुपमा लिहीते की, मैत्रीणीने दिलेल्या सल्ल्यानुसार मी एका कंपनीत १० हजारांची गुंतवणुक केली होती. कंपनी माझे पैसे व्याजासकट मागील वर्षीच डिसेंबरमध्ये देणार होती. मात्र, आता ती कंपनी माझे पैसे परत देण्यास टाळाटाळ करत आहे.

तसेच एका व्यक्तीनं लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर माझी दुचाकी गाडी घेतली होती. तेव्हा मी माझ्या मुळ गावी होती. जेव्हा मी परत आले तेव्हा त्यानं माझी दुचाकी देण्यास नकार दिला आहे,असंही अनुपमानं आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केल्याची माहिती आहे. अनुपमाच्या आत्महत्येच्या टोकाच्या निणर्यानं तीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी सीबीआयची धडक कारवाई; ‘या’ 6 जणांविरोधात FIR दाखल

“अयोध्या मुक्त झाली आता…; आखाडा परिषदेचं हिंदूंना आवाहन

पुणेकरांच्या चिंतेत वाढ; पुण्यातील कोरोनानं ओलांडला ‘हा’ धोकादायक आकडा!

‘या’ कारणाने सुशांतला 4 दिवस झोप नव्हती; सुशांतचा मित्र कुशलचा धक्कादायक खुलासा

सुशांत आत्महत्याप्रकरणी सीबीआयकडून 6 जणांवर गुन्हा दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या