बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संतापजनक! शेतकऱ्याच्या पोटावर अधिकाऱ्याने मारली लाथ, व्हिडीओ व्हायरल

जयपूर | सध्या सोशल मीडियावर एक संताप आणणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक अधिकारी शेतकऱ्याला लाथ मारताना दिसत आहे. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सांचौर भागात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सर्व या घटनेचा निषेध करत आहेत.

प्रतापपुरा गावात भारत माला प्रकल्पाअंतर्गत तयार होणाऱ्या हायवेअंतर्गत मोबदल्यासाठी शेतकऱ्या तेथील बांधकाम काम थांबवलं होतं. यावेळी सांचोर एसडीएमने शेतकऱ्यांना लाथ मारली. यानंतर शेतकरी आणि पोलीस यांच्यातही झटापट झाली.

अधिकाऱ्याने गावकऱ्यांवरच मारहाणीचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांनी माझ्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. त्यामुळेच मला स्वत:चा बचाव करण्यासाठी लाथ मारावी लागली, असं संबंधित अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

शेतकरी हे भारत माला प्रोजेक्ट अंतर्गत मोबादल्याची मागणी करत होते. अमृतनगर येथून जामनगरच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस वेचं काम हे गुरुवारी सुरू झालं आहे. याच दरम्यान काही गावकरी तेथे जमले आणि त्यांनी हे काम थांबवलं. त्यानंतर हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

भाजप-मनसे युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘झोटिंग कमिशनचा अहवाल सरकारपर्यंत आलाच नाही’; अजित पवारांचा मोठा खुलासा

सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप, ते सांगतील तो सल्ला ऐकण्यास तयार- सुभाष देशमुख

…त्यामुळे शरद पवारांना बळीचा बकरा बनवू नका- रामदास आठवले

“मोदींच्या सभेत काळ्या टोप्या आणि काळे मास्क उतरवण्यात आले, कलियुग म्हणतात ते हेच का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More