बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा आजची ताजी आकडेवारी

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट होत आहे. तर डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 134 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 211 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 2 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 5,00,385 इतकी आहे. तर पुण्यात ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आत्तापर्यंत एकूण 9020 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 4,89,882 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 8,694 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या-

‘पश्चिम महाराष्ट्राचं पाणी मराठवाड्याला आणणार’; जयंत पाटलांनी सांगितला मेगा प्लॅन

बाबो! ‘वर्ल्ड आयकाॅन’ एलोन मस्कने एका दिवसात कमावले तब्बल ‘इतके’ हजार कोटी

“भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा नाहीतर, 2 ऑक्टोबरला जलसमाधी घेणार”

किंग कोहलीने रचला इतिहास; ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

उद्या आणि परवा राज्यात मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून खबरदारीचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More