बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जनता कुंभकर्णासारखी झोपली आहे, मी एकटा काय करू?”

मुंबई | भाजप सरकारच्या काळात इतके भ्रष्टाचार बाहेर आले तरी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गप्प का?, असा सवाल इंडिया अगेंस्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला होता.  हेमंत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली.

या प्रसिद्धी पत्रकामध्ये हेमंत पाटील यांनी अण्णा हजारेंना काही प्रश्न केले होते. शेतकऱ्यांचं आंदोलन गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीत सुरु आहे. आजवर अण्णांनी त्याविरोधात एक शब्दही का काढला नाही?, असा सवाल अण्णांना केला. यावरून अण्णा हजारे सोशल मीडियावरही ट्रोल झाले होते. अशातच अण्णांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर पास करण्यात येत आहेत. मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहे. जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे, मी एकटा काय करू?. जनतेने आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली पाहिजे, तेव्हाच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द करेल, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीतर अंदोलन करू, असं अण्णा म्हणाले होते. मात्र भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या सहकाऱ्यांसोबत राळेगणसिद्धीमध्ये भेटून गेले त्यानंतर अण्णांची भूमिका बदलल्याचं हेमंत पाटील म्हणाले होते. दिल्लीमध्ये चालू असलेल्या शेतकरी आंदोलनार अद्यापही कोणता तोडगा निघालेला नाही. दिल्लीमध्ये अजुनही शेतकरी आंदोलन चालू आहे. आणखी किती दिवस हे आंदोलन चालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

अबब! थेट कारवरच उतरलं विमान… बघा नेमका काय घडला प्रकार

“आम्ही अस्वल… आमच्यावर खूप केस आहेत, दहीहंडी करणारच”

“मुख्यमंत्री आणि संजय राऊतांनी शरद पवारांची शिकवणी लावावी”

“शिवसेना-भाजपच्या भांडणात…”; प्रताप सरनाईक यांचं पुन्हा एकदा मोठं वक्तव्य

“मगरी असलेल्या विहिरीत टांगलं…” पुण्यातील गायकवाड बाप-लेकाचा आणखी एक प्रताप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More