नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधत असतात. आज सकाळी ११ वाजता देखील मोदी जनतेशी संवाद साधतील. सध्या देशावर कोरोनाचं संकट असल्यानं मोदी काय बोलतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आजच्या मन की बात कार्यक्रमासाठी लोकांच्या सूचना तसेच प्रश्न देखील मागवण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल होत आहेत त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान काही सूचना करतात का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
सध्या कोरोनाच्या संकटामुळे देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. दिल्लीसह काही भागातील लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे, मात्र रेड तसेच ऑरेंज झोन असलेल्या भागात लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे.
दरम्यान, कोरोनाच्या संकटाचा केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून सामना करत आहे. लवकरात लवकर कोरोना नियंत्रणात यावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी आपल्या मन की बात कार्यक्रमात काही घोषणा करतात का?, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
गृहमंत्री अनिल देशमुखांनी आजीबाईंना स्वत: घातला मास्क
लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंदच राहणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण