बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही संजय राऊतांची सवय”

मुंबई | आरोप किंवा तक्रार दाखल झाली तर कुठलीही एजन्सी हा तपास करते. त्यामुळे अशा प्रकारे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. संजय राऊत यांना भाजप द्वेषाची काविळ झाली आहे. अभ्यासाविना आणि अज्ञानापोटी राऊत फडणवीस व भाजपवर टीका करत असतात, असं म्हणत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

आमदार प्रसाद लाड यांच्या कार्यालयात पंतप्रधान मोदींचा ‘मन की बात कार्यक्रम’ दाखवला गेला. लाईव्ह स्क्रीनद्वारे याचं प्रक्षेपण करण्यात आलं. त्यानंतर प्रविण दरेकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दरेकरांनी राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

काँग्रेस केंद्रात सत्तेत होती त्यावेळेला ईडीच्या चौकशीचा दबाव टाकून सत्ता कशी राखली हे देशाला माहित आहे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही सवय संजय राऊत यांना आहे. त्यांच्या टीकेला काडीची किंमत नसून त्यांचे वक्तव्य संदर्भहीन असल्याची टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.

ईडी आणि सीबीआय देशातील स्वायत्त संस्था आहेत. संविधानात लोकशाही इतकी मजबूत आहे की, देशात कोणाचेही सरकार असो या संस्थांचा चुकीचा वापर करता येत नाही. तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. चुकीचं काम केलं असेल त्यांना तपास यंत्रणेच्या प्रक्रियेला सामोरं जावं लागतं, असं दरेकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘या’ तारखेपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू, लवकरच निर्णय जाहीर करणार- उदय सामंत 

‘लेकीनेही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवावी’; गुलाबराव पाटलांचं रक्षा खडसेंना प्रत्युत्तर

मन सुन्न करणारी घटना! भावाच्या निधनाचं वृत्त कळताच छोट्या भावानेही जीव सोडला, अन्…

मी छत्रपती घराण्याचा वारस आहे, कसा मॅनेज होईन?- खासदार संभाजीराजे

पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद नाही- जयंत पाटील

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More