“शरद पवारांचा नातू म्हणून रोहित पवारांना वेगळा न्याय का?”
मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली होती. यावेळी त्यांनी कोविड सेेंटरमधील रूग्णांसोबत त्यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरलेला व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र या व्हिडीओवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय दिला जाऊ शकतो का?, कुणीही लोकप्रतिनिधी असो किंवा मोठा नेता, त्यांनी करोना नियमांच गांभीर्य आणि भान ठेवलंच पाहिजे, अशी अपेक्षा आहे, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. त्यासोबतच रोहित पवार यांनी एका कोविड सेंटरवर जाऊन कोविड प्रोटोकॉलचा भंग केला, हे निषेधार्ह आहे. त्या ठिकाणी ते पीपीई किट न घालता गेले, रुग्णांमध्ये मिसळले, डान्स केला. त्यामुळे ते ‘सुपर स्प्रेडर’ ठरु शकतात, असंही प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.
सन्माननीय प्रविण दरेकरजी कोविड सेंटरमधली माणसं माझ्या कुटुंबातली असून त्यांच्यासाठी कितीही केलं तरी ते कमी आहे. त्यामुळं शक्य ते सगळं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांची काळजी घेतो. त्यांना काल एकच दिवस भेटलो असं नाही तर नेहमीच भेटत असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, लोकांत जाऊन त्यांच्या अडचणी सोडवणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं ही पवार कुटुंबाची संस्कृती असून तीही आमची एक ओळख आहे. हे कुणाला चूक वाटलं तरी त्याची पर्वा नाही आणि त्यात बदलही होणार नाही. मी एकटाच नाही तर शरद पवारांचा विचाराचे सर्व लोकप्रतिनिधी असंच काम करतात, असं रोहित पवार म्हणाले.
सन्माननीय @mipravindarekar साहेब कोविड सेंटरमधली माणसं माझ्या कुटुंबातली असून त्यांच्यासाठी कितीही केलं तरी ते कमी आहे. त्यामुळं शक्य ते सगळं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांची काळजी घेतो. त्यांना काल एकच दिवस भेटलो असं नाही तर नेहमीच भेटतो. https://t.co/UcLLAAsRT6
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 25, 2021
थोडक्यात बातम्या-
भारतातील कोरोनाचा अनुभव सांगताना ‘या’ क्रिकेटपटूला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ!
आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी
तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं निधन
कोरोना रूग्णांचा तणाव कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी करतायेत ‘हे’ काम, पाहा व्हिडीओ
धक्कादायक! वाढदिवसाची मित्रांना पार्टी देऊन घरी जाताना तरूणावर काळाचा घाला
Comments are closed.