बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ईडीच्या कारवाईवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

नवी दिल्ली |  महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत वाढ झाल्याची टीका सातत्यानं केंद्र सरकारवर होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीशी संबंधितांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकार विरोधकांना त्रास देत असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. मनमोहन सिंग, वायपेयी सरकारच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर कामासाठी केला जात होता, असं चव्हाण म्हणाले आहेत.

आताचे सरकार विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडी, सीबीआय, आयकर विभाग या संस्थांचा गैरवापर करत आहे. विरोधी राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी आता केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत आहे. हे लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका यावेळी चव्हाण यांनी केली आहे.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण हे कोल्हापूरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. सभेत बोलताना चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या टीकेला भाजप काय उत्तर देणार हे पहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

Raj Thackeray : “राज ठाकरेंना अटक करून तुरूंगात टाका”

वसंत मोरेंना पदावरून काढताच रूपाली ठोंबरेंचा धक्कादायक खुलासा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयचा नवा खुलासा, धक्कादायक माहिती समोर

मोठी बातमी! अमेरिकेचा रशियाला जोरदार झटका

“उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका म्हणजे एटीएम, नोटा छापण्याची एक मशीन”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More