बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या नावामुळे वातावरण तापलं, अक्षय कुमारचा पुतळा जाळत केली नारेबाजी

चंदिगढ | अक्षय कुमार आणि यशराज फिल्म्स निर्मित ‘पृथ्वीराज ‘या चित्रपटास चंदिगढमध्ये विरोधास सामोरे जावं लागत आहे. क्षत्रिय महासभेने या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला आहे. जोधा-अकबर, पद्मावत सारख्या चित्रपटांविषयीचा वाद तर तुम्हाला माहीत असेलच. आता अशाच प्रकारचा वाद पुन्हा अक्षय कुमार आणि यशराज फिल्म्स निर्मित ‘पृथ्वीराज’ या चित्रपटावरून सुरू झाला आहे.

चंदिगढमध्ये अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या उपस्थितीमध्ये ‘पृथ्वीराज’ चित्रपटा विरोधात आज जोरदार प्रदर्शन करण्यात आले. यावेळी अक्षय कुमारचा पुतळा देखील जाळण्यात आला आहे. संघटनेच्या लोकांची मागणी आहे की, चित्रपटाचे पृथ्वीराज हे नाव बदलून ‘हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान ‘ असे करण्यात यावे. कारण पृथ्वीराज चौहान हे शेवटचे हिंदू सम्राट होते त्यामुळे चित्रपटाला त्यांचं नाव हे सन्मानपूर्वक द्यायला पाहिजे.

तसेच संघटनेची आणखी एक मागणी आहे की, चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर हा चित्रपट एकदा राजपूत आणि क्षत्रिय समाज प्रतिनिधींना दाखवायला हवा. म्हणजे त्यांना चित्रपटात काही विवादास्पद आहे का ते आधीच समजले असते किंवा या चित्रपटामध्ये इतिहासाशी छेडछाड केलेलीही अगदोर समजले असते.

दरम्यान, अक्षय कुमार पुन्हा एकदा पृथ्वीराजच्या सेटवर परतला आहे. काही वेळ घरी घालवल्यानंतर अक्षयने चित्रपटाची शुटींग पुन्हा चालू केली आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार सोबत मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर देखील दिसणार आहे. मानुषीचा हा पहिलाच चित्रपट आहे.

थोडक्यात बातम्या –

चिंता वाढली! ‘या’ जिल्ह्यात लहान मुले कोरोनाबाधित होण्याचं प्रमाण झपाट्याने वाढलं

महाराष्ट्रातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 02 कोरोनाबाधितांचा मृत्यू

देवाची सावली! उद्यान एक्सप्रेससमोर झोपून देखील महिला जिवंत

सेमी फायनलचा वचपा काढण्यासाठी विराटसेना सज्ज; 11 शिलेदारांची यादी जाहीर!

आजोबा अरुण गवळीचा नातीला खेळवताना फोटो व्हायरल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More