पुणे महाराष्ट्र

पुणेकरांनो सावधान… पुण्यात आज सापडले कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण!

पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात सर्वाधिक कोरोनाचे 399 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या 4735 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर 446 रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

179 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले 175 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5181 झाली आहे. पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2182 एवढी आहे. तर आतापर्यंत 264 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 52 हजार 667 झाली आहे. आज 2436 नवीन रुग्णांचे निदान झालं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

लॉकडाउन वाढवणं आर्थिक दृष्टीने अनर्थकारी ठरेल- आनंद महिंद्रा

…म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता- तृप्ती देसाई

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; पाहा तुमच्या भागात किती?

अजितदादा कुठं आहेत?

“दोघांच्या भांडणात जनतेची स्थिती…आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या