बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी राहणार पाणीपुरवठा पुर्णपणे बंद

पुणे | पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता पुण्यातील पाणीपुरवठा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुरूस्तीच्या कामासाठी महापालिकेने हा पाणी पुरवठा खंडीत करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिका प्रशासनाने केलं आहे.

पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी संपुर्ण पुण्याचा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. हा बंद झालेला पाणी पुरवठा शुक्रवारी 22 ऑक्टोबरला उशिराने कमी दाबाने सुरू होईल, अशीही माहिती देण्यात आली आहे.

नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणेकरांनी पुरेसं पाणी साठवून ठेवून पाणी जपून वापरावं असं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे गुरूवारी पुणेकरांसाठी आता पाण्यासाठी काही प्रमाणात तारांबळ उडू शकते. तसेच शुक्रवारीही उशिराने आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याने नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणारे आणि आसपासचे सर्वच धरणं यंदा संपुर्ण क्षमतेनं भरले असून पुण्याच्या येत्या वर्ष भरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच यंदाच्या वर्षी पुणेकरांना मात्र पाणीकपातीला सामोरं जावं लागणार नाही.

थोडक्यात बातम्या

धावत्या रेल्वेतून गरोदर महिला पडली खाली, देवदूतासारखा धावून आला RPF जवान, पाहा व्हिडीओ

“हा केवळ योगायोग आहे की, मुख्यमंत्र्यांचं इटलीसोबतच लांगुलचालन?”

आर्यन खानच्या सुटकेसाठी ‘या’ शिवसेना नेत्याची थेट सर्वोच्च न्यायालयात धाव

पेट्रोल डिझेलनंतर आता भाज्यांचे दरही गडाडले, टोमॅटो 20 रुपयांवरून थेट 80 रुपयांवर

पाहावं ते नवलंच! जॅकलीन फर्नांडीसची हुबेहुब कार्बन काॅपी आहे ‘ही’ अभिनेत्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More