बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणामुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण झाली, अन्यथा निर्बंध हटले असते!

पुणे |  कोरोना रूग्णसंख्येत घट झाल्यानं बऱ्याच ठिकाणी नियम शिथील करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या कमी होत असली तरी, शहरातील कोरोना निर्बंध अजूनतरी हटवण्यात आले नाहीत. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण 6.11 टक्के इतकं आहे. त्यामुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण झाली आहे. 1.1 टक्के कोरोना बाधित रुग्ण अधिक असल्यानं पुण्यातील कोरोना निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. शासनाच्या नियमावलीनुसार पुण्यात 5 टक्के किंवा त्यापेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण असते, तर कोरोना निर्बंध जवळपास हटवण्यात आले असते.

महाराष्ट्रातील कोरोनाचा आलेख सध्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं कोरोना निर्बंध हटवले जात आहेत. शहरातील कोरोनाबाधित रुग्ण आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावरून शहरातील निर्बंध हटवायचे की नाही? याचा निर्णय घेतला जात आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्यानुसार शहरांची वेगवेगळ्या स्तरात विभागणी केली जात आहे. मात्र, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण शासनाच्या नियमावली पेक्षा 1.1 टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण झाली आहे. परिणामी कोरोना नियमांत सुट मिळाली नसून निर्बंध कायम ठेवले आहेत.

पुण्यात जर कोरोनाबाधित रुग्णांच प्रमाण 5 टक्केपेक्षा कमी असतं, तर दुकानं दिवसभर खुली ठेवण्यास परवानगी मिळाली असती. तसच नाट्यगृहे, मॉल 50 टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्यास मुभा मिळाली असती.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आला असून त्यामध्ये सातत्यानं घट होताना दिसत आहे. ही घट कायम राहिल्यास पुढील आठवड्यापर्यंत पुण्यातील कोरोना निर्बंध जवळपास हटण्याची शक्यता आहे. कारण पुढच्या आठवड्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 5 टक्क्यांपर्यंत येईल. त्यामुळे शासनाच्या नियमावलीनुसार जवळपास सर्व निर्बंध हटू शकतात.

थोडक्यात बातम्या –

‘…तर कोरोनाची तिसरी लाट अधिक धोकादायक ठरेल’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेची वाईट अवस्था केलीये- अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन

“पंतप्रधान मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात मग 15 एकरांच्या घराची गरजच काय?”

…अन् संजय दत्त अचानक पोहोचला मंत्री नितीन राऊत यांच्या घरी!

राज-उद्धव एकत्र येतील का?; उद्धव ठाकरे म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More