…म्हणून राधाकृष्ण विखे-पाटलांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!

अहमदनगर | पंतप्रधान नरेद्र मोदी शिर्डीला आले होते, या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील सुद्धा उपस्थित होते. 

कार्यक्रम संपल्यानंतर विखे-पाटलांनी नरेंद्र मोदींची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र ही भेट निळवंडे प्रकल्पासाठी घेतल्याचं समोर आलं आहे. 

निळवंडे प्रकल्पासाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी विखे-पाटलांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदनही त्यांनी यावेळी मोदींना दिलं. महाराष्ट्रातील दुष्काळासंदर्भातही ते मोदींशी बोलल्याचं कळतंय.

दरम्यान, मोदींच्या भाषणावेळी विखे-पाटील व्यासपीठावर होते. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि गांधी परिवारावर जोरदार टीकास्त्र सोडलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पोलिस तक्रार!

-‘मी टू’ विकृत मनाच्या लोकांनी सुरू केलेली मोहीम; भाजप मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

-महिलांनी मंदिरात प्रवेश केला तर टाळं ठोकू; पुजाऱ्याचा इशारा

-मला मिठाई देणार का? मोदींचा लाभार्थ्यांना मराठीतून सवाल!

-#MeToo | नाना-तनुश्रीचा वाद राखी सावंतला अटक होण्याची शक्यता?

-फेमिनाच्या कव्हरपेजवर झळकला मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा फोटो