Loading...

मी बिकाऊ नाही; भाजप खासदाराचं थेट मोदींना ट्विट

कोलकाता | भाजपच्या राज्यसभेच्या खासदार आणि अभिनेत्री रूपा गांगुली यांचा मुलगा आकाश मुखर्जीला कोलकत्ता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मद्यपान करून कार चालवताना झालेल्या दुर्घटनेप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर रूपा गांगुली यांनी पंतप्रधान मोदींना टॅग करून एक ट्विट केलं आहे.

माझं माझ्या मुलावर प्रेम आहे. मी त्याची काळजी घेईन, पण कायद्यानुसार सर्व प्रक्रिया व्हावी. ना मी चुकीचं करते, ना मी चुकीचं सहन करते.  मी बिकाऊ नाही, असं ट्विट करत रूपा यांनी नरेंद्र मोदींना टॅग केलं आहे.

Loading...

आकाश मुखर्जीची कार कोलकत्यामधील एका क्लबच्या भिंतीला आदळून अपघात झाला होता. यानंतर स्थानिकांनी आकाश नशेत असल्याचा आरोप केला. कार भिंतीला आदळल्याने अनेकांचा जीव वाचल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

दरम्यान, माझ्या मुलाचा माझ्या घराजवळचं अपघात झाला. मी पोलिसांना फोन करून कायद्यानुसार काळजी घेण्यास सांगितलं आहे. कोणताही पक्षपातीपणा किंवा कोणतंही राजकारण करू नये, असं रूपा गांगुली यांनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-अंबानी झाले आणखी श्रीमंत; गेल्या दोन दिवसात संपत्तीत झाली ‘इतक्या’ कोटींची वाढ!

Loading...

-…म्हणून मी निवडणूक लढवणार नाही- अजित पवार

-अटल बिहारी वाजपेयींचा पहिला स्मृतिदिन; राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली अर्पण

-प्रत्येक रक्षाबंधनाला पंकजा आणि प्रितमताई या दोघींचीही आठवण येते- धनंजय मुंडे

-शरद पवारांना वाटतं आम्हीच ज्ञानी आहोत- विखे पाटील

Loading...