मुंबई | औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी होत आहे. काँग्रसेने या मागणीला आपला विरोध असल्याचं सांगितलं आहे. याच मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. अशातच केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अधयक्ष रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगाबादचं नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. भाजपने औरंगाबादचं नाव बदलण्याची मागणी करत आहेत.
भाजप आणि मनसेनंही संभाजीनगर नाव करण्याची आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
औरंगाबाद चे नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) January 3, 2021
थोडक्यात बातम्या-
“जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण!”
‘…तर काँग्रेसला खूश केलं असतं’; कंगणा राणावतची उर्मिला मातोंडकरांवर बोचरी टीका
भिवंडीतील शिवसेना शाखा प्रमुखावर अज्ञातांकडून गोळीबार!
‘वैयक्तिक घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा’; नितेश राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र