Top News पुणे महाराष्ट्र

‘राहुल गांधी यांनी आता लग्न करायला हवं’; केंद्रीय मंत्र्याच्या गांधींना सल्ला

पुणे | दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला काँग्रसने पाठींबा देत कृषी कायद्यांना विरोध केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असतात. त्यासोबतच ‘हम दो हमारे दो’ असा नारा देत केंद्र सरकारवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राहुल गांधींना लग्न करण्याचा सल्ला देत त्यांच्यावर टीका केली आहे.

‘हम दो, हमारे दो’ हा जो नारा आहे तो राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी आहे. त्यांनी लग्न ‘हम दो हमारे दो’ अशा पद्धतीने करावं, असं म्हणत रामदास आठवलेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आठवले एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

शेतकरी आपला माल जिथं जास्त पैसे मिळतील तिथं विकू शकतात. शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदा नाही. शेतकरी असल्यानं आम्हाला खायला मिळतंय याची आम्हाला कल्पना आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कायदा आणलेला आहे. मात्र गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं रामदास आठवले म्हणाले.

आरोप प्रत्यारोप होत आहेतच. सर्व विरोधक एकवटले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरातील शेतकरी कायद्याच्या विरोधात नाहीत. पंजाब, हरियाणा येथील शेतकरी विरोध करत आहेत. मात्र मूळ शेतकरी आंदोलनाला आलेला नसल्याचं म्हणत आठवलेंनी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेना आक्रमक; संजय राठोडांना दिले ‘हे’ सक्त आदेश

IPS कृष्णप्रकाश अ‌ॅक्शन मोडमध्ये, अवैध धंदे करणारांची आता खैर नाही!

आता ट्रॅक्टरही सीएनजीवर, वर्षाला एक लाख रूपये वाचणार!

कोण होती पूजा चव्हाण? का होतेय तिच्या आत्महत्येची एवढी चर्चा???

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण; ही धक्कादायक माहिती आली समोर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या