सत्ता आहे तोपर्यंत भाजपसोबत, त्यानंतर हवा पाहून निर्णय घेईन- आठवले

मुंबई | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत मी भाजपसोबत आहे, असं रामदास आठवले यांनी सांगून टाकलंय. 

मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात रामदास आठवल बोलत होते. 

काँग्रेसचे नसीम खान मला त्यांच्यासोबत येण्याचं निमंत्रण देत आहेत. मी 10 ते 15 वर्षे त्यांच्यासोबत होतो. इकडेही मला 15-20 वर्षे रहावे लागणार आहे. जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत मी इथंच राहणार, असं रामदास आठवले म्हणाले. 

दरम्यान, मी हवेचा अंदाज घेईल आणि त्यानंतर कुठं जायचं ठरवेल, अशी जाहीर कबुलीही त्यांनी यावेळी दिली. त्यांच्या या वक्तव्याची आता एकच चर्चा सुरु आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-संजय निरुपम नरेंद्र मोदींवर भडकले; म्हणाले… ही तर संघटीत लूट!

-ओळखीचा फायदा घेतला; कॉफीत नशेचे पेय टाकून केला बलात्कार

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात आणखी एका महिलेचा मृत्यू

-पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात; पहा आजचे दर

-आठवडा उलटला; अवनीच्या त्या 2 बछड्यांचं नेमकं काय झालं?