देश

नव्या कृषी कायद्यांचा देशातील 10 कोटी छोटया शेतकऱ्यांना लाभ झाला- रामनाथ कोविंद

File Photo

नवी दिल्ली | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानानं सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणात कोरोना काळात सरकारकडून करण्यात आलेली मदत, कृषी कायद्यांना दिलेली मंजुरी, आत्मनिर्भर भारत यावर भाष्य केलं.

नव्या कृषी कायद्यांचा देशातील 10 कोटी छोटया शेतकऱ्यांना थोड्या काळामध्येच लाभ झाला, असं रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.

या कायद्यांच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करु, असं राष्ट्रपतींनी म्हटलंय.

कृषी कायद्यांद्वारे शेतकऱ्यांना नव्या सुविधा आणि नवे अधिकार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतीला अधिक फायदेशीर बनवण्यासाठी केंद्र सरकार आधुनिक कृषी पायाभूत व्यवस्था निर्माण करण्यावर भर देत आहे. त्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा अ‌ॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड सुरु करण्यात आला आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

प्रजासत्ताक दिनी झालेला तिरंग्याचा अपमान दुर्दैवी- रामनाथ कोविंद

उद्या अजित पवार पेट्रोल पंपात भेसळ करतो अशी बोंब व्हायची, आणि…- अजित पवार

मोदी-योगी सरकारला नडतोय एकटा नेता; म्हणाला, “गोळ्या घाला पण मागे हटणार नाही”

शेतकरी नेत्याच्या अश्रूंनी केली कमाल; एका रात्रीत शेतकरी आंदोलन पुन्हा पेटलं!

…अन् शेतकरी नेत्यानं त्या व्यक्तीच्या जोरात कानाखाली ओढली, पाहा Video

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या