राणा दाम्पत्यांना पुन्हा न्यायालयाचा झटका, ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
मुंबई | आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठन करणार असल्याचा इशारा दिला होता. राणा दाम्पत्यांच्या इशाऱ्यानंतर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
राणा दाम्पत्यांविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर कोर्टाने आज निर्णय दिला नाही. बुधवारी सकाळी हा निर्णय दिला जाईल, असं न्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे.
बुधवारी निर्णय होणार असल्यामुळं आता राणा दाम्पत्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. आजची त्यांना दिलासा मिळालेला नाही. राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने आजही दिलासा दिलेला नसून 4 मे रोजी सकाळी 11 वाजता जामीनावर निकाल दिला जाणार आहे.
दरम्यान, राजद्रोहाच्या आरोपाखाली खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे राज्यभरात सध्या गदारोळ पहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
“राज ठाकरेंना तुरुंगात टाका, त्यांचं डोकं शांत होईल”
मोठी बातमी ! नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
औरंगाबादमधल्या गर्जनेनंतर राज ठाकरेंचं पहिलं ट्विट, म्हणाले…
लसीकरणाविषयी सुप्रीम कोर्टानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
‘महाराष्ट्रात हुकुमशाही चालणार नाही’; अजित पवारांचा गंभीर इशारा
Comments are closed.