बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर शेतकरीसुद्धा तुमचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याशिवाय राहणार नाहीत”

मुंबई | राज्यात मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी सुरू आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच नद्यांना पूर आला आहे.. सर्व धरणांनी धोक्याची रेषा ओलांडली असुन जिकडेतिकडे सर्वत्र पाणी आहे. यामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि कपाशी पुर्णपणे हातुन गेलं आहे. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. मात्र दुसरीकडे मराठवाडयात परळीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांचं मिरवणुक काढली होती. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रणजित बागल यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

आज होत असलेल्या नुकसानीचं मोल हे अगणित प्रमाणात आहे. घरंदारं उध्वस्त होतअसून शेतकऱ्यांना शेवटी सरकारी मदतीशिवाय पर्याय नाही. मदत मिळेल ही सरकारकडून पण तिथ त्यांच्याच भागात जावुन त्यांच्याच समोर तुम्ही आपलाच उदोउदो करत तिथल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंचे मुल्य मातीमोल करु नका अन्यथा इथला शेतकरी देखील मागच्यांप्रमाणे तुमचा देखील “करेक्ट कार्यक्रम” केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात रणजित बागल यांनी टीका केली आहे.

राज्यात स्वतःची सुसंस्कृत जबाबदार आणि संवेदनशील नेता म्हणुन स्वतः वेगळी ओळख निर्माण करणार्‍या जयंतरावांना काल सत्कार अन् हारतुरे यांच्या डौलाच्या धुंदीत त्याच मराठवाड्या्च्या शेतकऱ्यांची अतिवृष्टीने झालेली दैना दिसली नसेल का?, सत्तेची धुंदी इतकीही डोक्यात जावु द्यायची नसते मंत्री महोदय, असं रणजित बागल म्हणाले.

दरम्यान, राज्यात एक संवेदनशील नेतृत्व म्हणुन आपले कार्यकर्ते राज्यभर ऊर बडवुन सांगतात आणि तिच संवेदनशीलता तुम्ही आपल्या सत्तेच्या अन् पदाच्या रूबाबात पायदळी तुडवता. जयंतराव, निदान लोकांना मदत देणं जमणार नसेल तर त्यांच्या जखमेवर मीठ तरी चोळु नका, असं रणजित बागल यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“जेव्हा लोक सत्तेसाठी लोभी होतात, तेव्हा ते आपल्या मुली…”; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य!

#Video | देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो! ताजोद्दीन महाराजांनी चालू कीर्तनात देह ठेवला

“आमच्या सरकारमध्ये मोबाईल वाजला तर शेतकऱ्यांना वाटायचं मदत आली”

“पंतप्रधान मोदींनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला मदत जाहीर करावी”

‘एका पार्टीला मी 2 लाख खर्च करतो, तर 10 लाखांसाठी…’; फिक्सिंगच्या आरोपावर श्रीसंतने सोडलं मौन!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More