बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकलबाबत घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

नागपूर | कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढत जात आहे. त्यात मुंबईची कोरोना रूग्णसंख्या रोज 35 ते 40 हजाराने वाढत आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे, मात्र लाॅकडाऊन लावला नसला तरी कडक निर्बंध लावल्या जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपूरात बोलतांना दिली आहे.

विजय वडेट्टीवार सध्या नागपुरात आहेत. नागपुरातील कोरोना रुग्णवाढ चिंतेची असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. 25 वर्षांच्या आतील तरुणांना संसर्ग होत आहे. इतकंच नाही तर लहानग्यांनाही कोरोना होत असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं. रुग्णवाढ होत असताना थोडीशी दिलासादायक बाब म्हणजे 80 टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणं नाहीत, असंही ते म्हणाले आहेत.

मुंबई लोकलबद्दल वडेट्टीवार यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी महत्वाची घोषणा केली आहे.  लाॅकडाऊन हा सर्वसामान्यांना परवडणारा पर्याय नाही. गर्दी कशी कमी होईल, यावर भर दिला जाईल. लॉकडाऊन जरी नसला तरी निर्बंध अधिक कडक केले जातील असं त्यांनी सांगितलं. मुंबई लोकल बंद होणार नाही, पण प्रवाशांची विभागणी करण्यात येईल. लोकल चालू असतील मात्र निर्बंध लागतील, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान,  रुग्णसंख्या वाढत असली तरी बेड कसे वाढवता येतील याकडे लक्ष आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्तदान करा ते श्रेष्ठदान आहे, नागपूरकरांनी नागपूरकरांचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान करा, असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. ‘नागपूरात रुग्ण मोठ्या संख्येनं निघत आहेत, तरी 80 टक्के लोकं कोरोना लक्षणं नसलेले आहेत. राज्यात उपलब्ध साधनांच्या आधारे परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न चालू आहे. नागपूर जिल्ह्याला अतिरिक्त 65 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत, अधिक निधी लागला तरी आम्ही देऊ. नियोजन काहीसं चुकलंच, रुग्ण मोठ्या संख्येने निघतील असं वाटलं नव्हतं’, असंही ते यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या

चोरीनंतर झालं असं काही की… चोराला अत्यानंदानेच आला हृदयविकाराचा झटका 

पुण्यात कोरोनाचा डेंजर प्रसार सुरु, पाहा गेल्या 7 दिवसांची धक्कादायक आकडेवारी

शरद पवारांच्या प्रकृतीवर केलेल्या टीकेबद्दल भाजपने ‘माफी’ मागावी, नाहीतर…- हसन मुश्रीफ

पुण्यात संध्याकाळी ६ नंतर सारं काही बंद, मात्र फूड डिलिव्हरीसंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय

कोरोनाचा नवा विषाणू आहे अत्यंत घातक, जाणून घ्या नवीन विषाणूची लक्षणं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More