रस्त्यावरील खड्ड्यांचे आणखी 2 बळी; 11 महिन्यांच्या मुलासह आईचा करुण अंत

मुंबई | रस्त्यावर असलेला खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात आई आणि 11 महिन्यांच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दुचाकी चालवणारे पिता या अपघातात गंभीर जखमी झाले अाहेत. गोवंडीमध्ये हा अपघात झाला आहे.

रात्री एकच्या सुमारास प्रमोद घडशी पत्नी पूजा आणि मुलगा समर्थसह घरी परतत होते. मागून येणाऱ्या महापालिकेच्या डम्परनं जोरजोरात हॉर्न वाजवल्यानं प्रमोद यांनी गाडी बाजूला घेतली, मात्र खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात गाडी पडली. डंपर जवळूनच जात असल्याने पूजा आणि समर्थ डंपरखाली चिरडले गेले.

तिघांना पोलिस आणि नागरिकांनी रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. 

दरम्यान, याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-विराट कोहली तू हे करुन दाखव; रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरचं चॅलेंज

-फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनमध्ये मेगा भरती; 1 लाख 20 हजार नोकऱ्या?

-खंडणीसाठी स्टिंग ऑपरेशन; टीव्ही चॅनेलच्या संपादकाला अटक

-रामजन्मभूमीचं ठिकाण अटळ; ती जागा कोणीच बदलू शकत नाही!

-180 जणांना घेऊन जाणारं प्रवासी विमान समुद्रात कोसळलं

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या