बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझी आई माझ्या घरी राहते, मी कॅमेरावाल्यांना घेऊन आईला भेटत नाही”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2022) घवघवीत यश मिळालं. पाच पैकी चार राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली. चार राज्यातील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी गुजरातमध्ये भव्य रोड शो काढला.

सर्व राजकीय कार्यक्रम आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी त्यांच्या आईच्या भेटीला गेले. तब्बल दोन वर्षांनी पंतप्रधान मोदी व त्यांची आई हिराबेन यांची भेट झाली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. या फोटोवरून काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे.

माझी आई माझ्यासाठी विश्व आहे. माझी आई माझ्या घरी राहते. म्हणून माझ्या आईला मी दररोज भेटतो. मी माझ्या आईला भेटल्याशिवाय आणि आईला माझ्याशी भेटल्याशिवाय चैन पडत नाही. मी कॅमेरावाल्यांना घेऊन आईला भेटत नाही, असं ट्विट करत सचिन सावंतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी व त्यांच्या आईच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. एका फोटोत मोदी त्यांच्या आईचा आशिर्वाद घेताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत मोदी त्यांच्या आईसोबत बसून जेवण करत आहे. ऑक्टोबर 2019 नंतर मोदींनी पहिल्यांदाच त्यांच्या आईची भेट घेतली.

 

थोडक्यात बातम्या-

“‘सामना’कार रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी साठी रवाना, झुकेगा नहीं साला”

“सेक्सी आणि हॉट म्हणून ओळखलं जाणं मला आवडतं”

पुतिन यांनी मोडला तब्बल 70 वर्षांपूर्वीचा ‘हा’ रेकॉर्ड

‘आप’ संदर्भात गोपीनाथ मुंडेंनी केलेली ‘ती’ भविष्यवाणी चर्चेत; पाहा व्हिडीओ

मुंबईतील कपलचा खुल्लम-खुल्ला प्यार, kiss करतानाचा व्हिडीओ व्हायरल; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More