महाराष्ट्र मुंबई

“भाजपने कुठलीही पालिका निवडणूक लढवावी, त्यांचा पराभव निश्चित”

मुंबई | मतदारांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवली आहे, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

भाजपने कुठल्याही पालिका निवडणुकीची तयारी करावी; महाविकास आघाडी त्यांचा पराभव निश्चित करेल, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

केंद्रीय संस्थांचा वापर करुन ऑपरेशन लोटस राबवण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जातोय. त्यासाठी ईडी, सीबीआयचाही वापर केला जात आहे. पण या सर्वांचा आमच्या आमदारांवर कुठलाही परिणाम होणार नाही, असं सचिन सवंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील जनतेने महाविकास आघाडीला स्वीकारलं आहे, असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘ग्लोबल टीचर’ रणजीत डिसले यांना कोरोनाची लागण!

‘कृषी कायदा रद्द करा’; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी

शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला आहे- राहुल गांधी

मोदी सरकारचा ‘तो’ प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला; शेतकरी मागणीवर ठाम

पुढील सुनावणीपर्यंत मराठा तरुणांचं काय?; खासदार संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला सवाल

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या