बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अजितदादा मराठ्यांचा घात करू नका’; मराठा आरक्षणाबाबत संभाजी ब्रिगेड आक्रमक

पुणे | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा आरक्षणाचा तिढा आणखी गुतागुंतीचा झाला आहे. राज्य सरकार हा प्रश्न केंद्र सरकारच्या मदतीने सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रश्नावर आता संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहल्याची बातमी आली. पुन्हा एकदा मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. माननीय गायकवाड आयोगाचा अहवाल स्विकारून सरसकट ओबीसी समावेश जे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत आहे. त्या विकल्पाकडे ठरवून दुर्लक्ष करून केंद्राकडे बोटं दाखवून हात झटकण्याचा घृणास्पद प्रकार मुख्यमंत्री करत आहेत, असा आरोप सौरभ खेडेकर यांनी केला आहे.

अजित पवार यांनी तीन महिन्यांपूर्वी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या पर्यायाविषयी सुचित केलं होतं. मात्र, आता हा पर्याय पूर्णपणे बाजूला सारण्यात आला आहे. त्यामुळं अजितदादा मराठ्यांचा घात करू नका, असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला आहे. ज्या व्यक्तीने कधीही शब्द बदलला नाही, अशा बाळासाहेबांचे उद्धव ठाकरे वारस आहेत. परंतु, सध्या बारामतीची हवा त्यांना जरा जास्तच मानवलेली दिसत आहे. गोड बोलून पाठीत सुरी खुपसू नये,  अशी टीका सौरभ खेडेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणि मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तर लवकरच उद्धव ठाकरे पंतप्रधानांना भेटून मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना रूग्णांसाठी वेबसाईट बनवणाऱ्या दहावीच्या मुलाला महापौरांनी दिली शाबासकीची थाप

पुणे पोलिसांनी वर्षभरात तब्बल एवढ्या पुणेकरांवर केली मास्क न वापरल्याबद्दल कारवाई

श्रीलंका दौऱ्यात हार्दिक पांड्या भारताचा कर्णधार?, अजूनही एका नावाची चर्चा

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 92 टक्यांवर

कोरोना रुग्णांना हे इंजेक्शन देऊ नका, WHOनं भारताला दिला महत्त्वाचा सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More