बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“किरीट सोमय्यांचं नाट्य म्हणजे मराठी रंगभूमीचा अपमान”

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत आहेत. किरीट सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यानंतर आता महाविकास आघाडी विरूद्ध किरीट सोमय्या असं शाब्दिक संघर्ष पहायला मिळत आहे. त्यातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.

किरीट सोमय्या जे नाटक करत आहेत, त्याला नाटक म्हणू नका. त्यामुळे नाटक या शब्दाचा अपमान होतोय, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्रात नाटक या शब्दाला प्रतिष्ठा आहे, असंही राऊत म्हणाले आहेत. कोणावर आरोप केल्यानंतर सरकार काही पडत नाही. आता आरोप करणं ही फॅशन झाली असल्याची टीका देखील राऊतांनी यावेळी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तर देश विकल्याचा आरोप होत आहे. मोदींवर झालेल्या आरोपांमुळे केंद्रातील सरकार पडल का? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे. किरीट सोमय्यांना केलेल्या जिल्हाबंदीचा मुख्यमंत्री कार्यालयाशी काहीही संबंध नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. एखाद्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर तिथे कारवाई करण्याचा अधिकार गृहविभागाला आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून अडवण्यात आलं होतं. परंतु, रात्री उशीरा सोमय्या कोल्हापूरला झाले. त्यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्यांना कराड येथं अडवलं होतं. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा आरोप केले होते.

थोडक्यात बातम्या-

‘ब्युरोक्रेसी काहीच नाही, ते आमच्या चपला उचलतात’; उमा भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य

किरीट सोमय्या ईडीचे प्रमुख आहेत का?- सुप्रिया सुळे

“…तर आज महात्मा गांधी यांच्यापेक्षा राखी सावंत महान ठरली असती”

मनोहर मामाच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी

Altroz CNG च्या प्रतिक्षेत असलेल्या कार चाहत्यांसाठी खुशखबर, कार होतेय लाँच, जाणून घ्या किंमत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More