“मावळे असतात म्हणून राजे असतात, राजांना पक्षांचं वावडं असू नये”
मुंबई | राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोल्हापूरचे शिवसेनेचे कट्टर समर्थक संजय पवार (Sanjay Pawar) यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay pawar) यांनी दिली आहे.
आमच्याकडे प्रस्ताव आला त्यावेळी गादीचा सन्मान, छत्रपतींचा सन्मान याचा विचार करुन त्यांना प्रस्ताव दिला होता. मावळे असतात म्हणून राजे असतात असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेचं दोन संजय राज्यसभेत जाणार हे फायनल झालेलं आहे. संजय पवार हे शिवसेनेचे मावळे आहेत. उद्धव ठाकरे यांनी मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय. त्यासंदर्भात अधिकृत घोषणा नंतर केली जाईल, असं संजय राऊत म्हणाले.
दोन्ही जागा शिवसेनच्या आहेत. दोन्ही जागांवर शिवसेना लढेल आणि दोन्ही जागांवर सेनेचे उमेदवार जिंकून येतील. कोल्हापुरचे संजय पवार गेली ३० वर्ष शिवसैनिक आहेत. कडवट सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. पक्का मावळा आहे आणि मावळे असतात म्हणून राजे असतात, हे ही लक्षात घ्या… राजांना पक्षाचं वावडं असू नये, असं राऊत म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
ओबीसी आरक्षणाबाबत दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केतकी चितळेला न्यायालयाचा दणका!
“तेल लावलेल्या पैलवानाची गुडघ्यात अक्कल असलेल्या पैलवानासोबत युती”
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“…म्हणून या सरकारचं नाव जुम्मे के जुम्मे सरकार”
Comments are closed.