Top News मुंबई

मुंबईच्या रस्त्यांवर फिरतोय सांताक्लॉज; भेट म्हणून देतो मास्क आणि सॅनिटायझर

मुंबई | ख्रिसमस म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो लाल कपजे परिधान केलेला सांताक्लॉज. दर ख्रिसमसला सांताक्लॉज येऊन गिफ्ट देतो. दरम्यान मुंबईच्या रस्त्यावर देखील सध्या एक सांताक्लॉज आलाय.

मुंबईच्या रस्त्यावर फिरणारा हा सांताक्लॉल लोकांना तसंच लहान मुलांना गिफ्टही देतोय. यंदाच्या वर्षी हा सांताक्लॉज मुंबईच्या रस्त्यांवर फिरून कोरोनासंदर्भात जनजागृती करताना दिसतोय.

सायन फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून दरवर्षी सांताक्लॉज बनून सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच माध्यमातून यावर्षी कोरोनासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातोय.

कोरोना प्रादुर्भावामुळे या सांताक्लॉजने मास्क आणि हँड सॅनिटायझरचं वाटप केलंय. इतकंच नव्हे तर आतापर्यंत जवळपास १२० बसेसमध्ये तसंच बसस्टॉपवर फवारणी सुद्धा केलीये.

थोडक्यात बातम्या-

समितीतील सदस्यांना बोलण्याचा अधिकार नाही का?; राहुल गांधींचा सवाल

बापरे! हॉटेलमध्ये आलेल्या कस्टमरने दिल्ली चक्क लाखो रूपयांची टीप

मेसेज आलेल्या व्यक्तीला दिली जाणार कोरोनाची लस; आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

…तर जानेवारीपासून राज्यात लसीकरणाला सुरुवात होईल- राजेश टोपे

कर्णधार विराट कोहलीच्या नावे नवा विक्रम; धोनीलाही टाकलं मागे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या