औरंगाबाद | अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणाऱ्या एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी याबाबत आदेश दिले.
मतीन यांना यापुढे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बसू न देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांचं नगरसेवकत्व रद्द करण्यासाठी शासनाकडे शिफारस करणार असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं.
मतीन यांनी अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास विरोध केल्यानं इतर नगरसेवकांनी त्यांना चोप दिला. मतीन यांचं यापूर्वीचं वर्तनही वादग्रस्त असल्याचं कळतंय.
महत्त्वाच्या बातम्या-
-स्फोटकं सापडलेल्या वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपाऱ्यात भव्य मोर्चा
-धक्कादायक! छेडछाडीला विरोध केल्यामुळे दहावीतील मुलीला पेटवलं
-सलमानच्या ‘भारत’चा टीझर प्रदर्शित, पहा टीझर
-पुढच्या निवडणुकीत माझा बळी देऊ नका; आमदार सतेज पाटलांची कार्यकर्त्यांना विंनती!
-‘शिवडे, I Am Sorry’ पिंपरीतील प्रेमवीराचा पोस्टर लावून माफिनामा