मुंबई | राज्यात सध्या मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाल्यासारखं दिसत आहे. भाजप नेते कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत. राणा दाम्पत्यावर न्यायालयानं कारवाई केली आहे. या सर्व मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सडेतोड भाष्य केलं आहे.
सत्ता गेल्यानं काही जण अस्वस्थ आहेत. सत्ता गेल्यानं वाईट वाटणं स्वाभाविक आहे पण सत्ता येत जात असते. सत्ता गेल्यानं अस्वस्थ होण्याच कारण नाही, असा टोला पवारांनी भाजपला लगावला आहे. मी अनेकदा सत्ता गमावली पण त्यामुळं कधी अस्वस्थ झालो नाही, असं म्हणत पवारांनी सत्ता बदलाच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या आहेत.
1978 मध्ये पुलोदचं सरकार होतं, 1980 ला पंतप्रधान इंदिरा गांधींनी शिफारस केल्यानं पुलोद सरकार बरखास्त झालं पण मी अस्वस्थ झालो नाही, असं पवार म्हणाले आहेत. सरकार बरखास्त केलं असल्याची माहिती मला माझ्या सचिवांकडून समजली. त्यानंतर लगेच मी माझ्या मित्रांना बोलावून घेतलं आणि सामानाची सारवासारव केली, असं पवार म्हणाले.
आवराआवर केली आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. तेव्हा वानखेडे मैदानावर भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामना चालू होता. तो सामना पाहायला मी मैदानात गेलो, अशी आठवण पवारांनी सांगितली आहे.
हनुमान चालीसाच्या वादावर देखील पवारांनी भाष्य केलं आहे. सर्वांनी निर्णय घेवून सामोपचारानं प्रश्न मिटवल्यास उत्तम होईल, असं पवार म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या –
सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ शिवसेना नेत्याला अटक
मुंबई उच्च न्यायालयानं राणा दाम्पत्याला झाप झाप झापलं!
“भारताचे पुढील पंतप्रधान गौतम अदानी होणार”
“माझे शब्द लिहून ठेवा, एक दिवस ऊसामुळं आत्महत्येची वेळ येईल”
‘मी खालच्या जातीची असल्याचं म्हणत त्यांनी मला…’; नवनीत राणांचा अत्यंत गंभीर आरोप
Comments are closed.