बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भररस्त्यात दोन महिलांमध्ये हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकांसोबत भांडण करत आहेत. एकीच्या हातात झाडू आहे आणि ती याच झाडूनं समोरच्या महिलेला मारत आहे.

दोन महिलांमधील भांडणाचं कारण स्पष्ट झालेलं नाही. या व्हिडीओमधील दुसरी महिला स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महिलेला केस धरुन झाडूने मारत आहेत. दोघींच्या भांडणांमध्ये एका महिलेने हस्तक्षेप करत ही माझी बहिण आहे आणि तुम्ही तिला मारु शकत नाही, असं म्हणत महिलेचा बचाव केला.

वाचवण्यास आलेल्या महिलेची भाषा पंजाबी आसल्याचं दिसतंय. तर भांडणं चालू आसताना मोठी गर्दी देखील जमली. मात्र सर्व भांडणाचा आनंद घेत होते तर काही जण व्हिडीओ शूट करत होते. आता या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी असं म्हटलं आहे, की हा एखाद्या सिनेमातील शूटींगचा भाग वाटत आहे. तर, काहींचं असं म्हणणं आहे, की या महिला ओव्हरअॅक्टींग करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

थोडक्यात बातम्या-

भारतापुढचं सर्वांत मोठं आव्हान मोदींनी सांगितलं, म्हणाले…

पुणेकरांना दिलासा! आजपासून ‘या’ नियमांमध्ये मिळणार सवलत

‘प्रत्येक घरात वीज आणि शौचालय पोहोचलं आता…’; लाल किल्ल्यावरुन मोदींकडून नवी घोषणा

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात, 54 कोटींपेक्षा जास्त लोक लसवंत- नरेंद्र मोदी

लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More