बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अल्पवयीन मुलीवर दोन महिने बलात्कार; पीडिता गरोदर राहिल्यानंतर समोर आला धक्कादायक प्रकार

पाटणा | बिहारमधील गयामध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. 60 वर्षाचा वृद्ध, अल्पवयीन मुलीवर दोन महिने बलात्कार करत होता. संबंधित आरोपीचं नाव आशिक मियां असं आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित वृद्ध हा अल्पवयीन मुलीच्या गावातील रहिवासी आहे. आरोपी दोन महिने मुलीवर बलात्कार करत होता. त्यानंतर संबंधित मुलगी गरोदर राहिल्याचं समोर आलं. ही बाब समोर येताच तरुणीच्या घरातल्यांना धक्का बसला. याबाबत विचारपूस केल्यावर तरुणीने तिला धमकवण्यात आलं असल्याचं सांगितलं. यादरम्यान कोणाला काही सांगितलं तर तिला जीवे मारण्यात येईल अशी धमकी देण्यात आली होती.

गरोदर राहिल्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी तरुणीसह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. एवढंच नाही तर तरुणीची देखील वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर आता आरोपीची चौकशी करण्यात येत आहे. तसेच चौकशीनंतरच या प्रकरणाचं सत्य समोर येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 2 दिवसापुर्वी मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये एका 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. संबंधित अल्पवयीन मुलीवर तिच्या मानलेल्या भावाने बलात्कार केल्याचं समोर येताच संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित आरोपीने त्याच्या मित्रासोबत मिळून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली होती.

थोडक्यात बातम्या-

पदोन्नतीच्या आरक्षणावरून ठाकरे सरकारमध्ये ठिणगी; ‘या’ काँग्रेस मंत्र्याचा ठाकरे सरकारला इशारा

तरणीबांड मुलं एका तासाच्या अंतराने गेली, वडिलांनीही जीव सोडला!

“महाराष्ट्रातलं सरकार आपण घालवू या फाजील विश्वासावर विरोधी पक्ष जगतोय”

‘पुण्यातील लहान मुलांचे लसीकरण करा’; बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने दिली महत्वाची सुचना

नियम मोडणाऱ्या वऱ्हाडींना पोलिसांनी शिकवला धडा, पहा काय घडलं..!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More