बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी 5 वेळा मोबाईल बदलला पण…’; प्रशांत किशोर यांचा धक्कादायक आरोप

नवी दिल्ली | इस्त्राईलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकारांवर पाळत ठेवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या प्रकरणाचा छडा फाॅरेन्सिक तपासातून झाल्याचा खळबळजनक दावा ‘द वायर’ या वृत्तसंस्थेसह जगभरातील 15 मीडिया संस्थांनी केला होता. या साॅफ्टवेअरद्वारे भारतातील 300 हून अधिक लोकांवर नजर ठेवण्यात येत असल्याचा खुलासा या वृत्तामध्ये करण्यात आला होता.

माध्यमांमध्ये बातमी आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. खुद्द केंद्र सरकारला या प्रकरणी उत्तर द्यावं लागलं होतं. या प्रकरणात आता प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देखील केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. ‘मी पाच वेळा माझा मोबाईल बदलला, परंतु हॅकींग सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 14 जुलै रोजी प्रशांत किशोर यांच्या फोनशी छेडछानी केल्याचा रिपोर्ट मीडिया संस्थांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

इस्त्राईलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून जगभरातील 1400 लोकांवर पाळत ठेवण्यात येत असल्याचा खुलासा करण्यात आला होता. तर भारतात 300हून अधिक नागरिक आणि काही पत्रकारांवर नजर ठेवण्यात येत असल्याचं देखील अहवालात म्हटलं आहे. हे आरोप झाल्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ हे आरोप फेटाळून लावले आहेत. भारतीय लोकशाहीत खासगीपणा हा एक अधिकार आहे. वृत्तसंस्थांनी दिलेले वृत्त पूर्णपणे खोटं असल्यांचं सरकारने सांगितलंय.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इस्त्रायली साॅफ्टवेयर पेगाससद्वारे केलेल्या गुप्तहेरीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. तुम्ही आमच्या फोनमध्ये काय वाचता हे आम्हाला माहिती आहे, असं ट्विट करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रशांत किशोर, टीएमसीचे नेते अभिषेक बॅनर्जी, केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्यावर देखील पाळत ठेवली जात असल्याचं समोर आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचं आता काही खरं नाही; होऊ शकते ‘इतक्या’ वर्षांची शिक्षा

“बा विठ्ठला…. जसे स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच मंत्रालयातही जाऊ दे”

“उठा उठा आषाढी आली, स्वबळावर गाडी चालवत पंढरीला जायची वेळ आली”

“आम्हाला ते पूर्वीचं वारकऱ्यांनी तुडुंब भरलेलं आनंदी पंढरपूर पहायचंय”

“राहुल गांधींनी दाखवून दिलंय, कुणाची दादागिरी आता चालणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More