बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…असलं काही बोलून, पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी करू नका’; राहुल गांधी मोदींवर बरसले

नवी दिल्ली | गेल्या आठवड्यात काॅंग्रेसने महागाई विरोधात दिल्लीत जोरदार आंदोलन केलंं. त्यावेळी काॅंग्रेसने(Congress) मोदी सरकारवर सडकून टीका केली. या आंदोलनातील अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले होते. या आंदोलनात काॅंग्रेसने काळी कपडे घातल्याने या आंदोलनाची चर्चा देशभर सुरू आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही(PM Narendra Modi) टीका केली होती.

मोदी या आंदोलनावर म्हणाले होते की, काही लोकांनी ‘काळी जादू’ करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना वाटतं की, काळी वस्त्रे घातली तर आपल्या सर्व समस्या दूर होतील, नैराश्य दूर होईल. पण जादूटोणा, काळी जादू यांसारख्या अंधश्रद्धेतून ते जनतेचा विश्वास मिळवू शकत नाहीत. सध्या तुमचे वाईट दिवस सुरू आहेत, पण काळ्या जादूने तुमचे वाईट दिवस संपणार नाहीत, अशी टीका मोदींनी काॅंग्रेसवर केली होती.

मोदींच्या या वाक्यावर राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी ट्विट करत मोदींवर हल्लाबोल केला आहे. आपले काळे कारनामे लपवण्यासाठी, ‘काळी जादू’ सारख्या अंधविश्वासाच्या गोष्टी बोलून, पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी करू नका आणि देशाला भटकवणे बंद करा, देशाच्या मुद्द्यांवर उत्तर तर द्यायलाच लागेन, असं प्रत्युत्तर गांधी यांनी मोदींना दिलं आहे.

दरम्यान, मोदींना महागाई दिसत नाही, बेरोजगारी दिसत नाही, असंही गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. काॅंग्रेस आणि भाजप यांच्यात असे आरोप-प्रत्यारोप नेहमीच सुरू असतात, पण गांधी यांच्या ट्विटवर मोदी उत्तर देतील का ?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ईडीच्या रडारवर असलेल्या भानवा गवळींनी बांधली मोदींना राखी

आरोप करणाऱ्यांना संजय राठोडांचा गंभीर इशारा, म्हणाले…

वरूण गांधीचा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर, ‘या’ मुद्द्यावरून घेतला खरपूस समाचार

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल महत्वाची माहिती समोर

“शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मांदियाळी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More