बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमत्र्यांना हात जोडून विनंती करतो, की पांडुरंगाच्या महापूजेला येऊ नका- बंडातात्या कराडकर

मुंबई | आज संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे. मागिल वर्षीप्रमाणे याही वर्षी राज्य सरकारने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता वारीला परवानगी दिली नाही. यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदाय नाराज झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कारडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आपल्य ट्विटर अकाऊंटवरून जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये मी संपूर्ण वारकरी संप्रदायामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हात जोडून विनंती करतो की, पांडुरंगाच्या महापूजेला येण्याची तसदी घेऊ नये, असं बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे.

एका बाजूला मुख्यमंत्री सर्व संतांच्या पालख्या पायी जाण्याची प्रथा मोडून काढायची. पालखी बरोबर फक्त 50 लोक जाऊदेत, अशी विनंती करूनही. ती विनंती धुडकाऊन लावली. त्याचप्रमाणे वारीत कोणाला पायी चालूही द्यायचं नाही. जी माणसं पायी चालतात त्यांच्यावर दहशतवाद करायचा. वारकऱ्यांची पताका, चिपळी हिसकावून घ्यायची, तसंच त्या वारकऱ्याला धोतराच्या पोशाखात चालू का, अशी ताकीदही द्यायची. आणि दुसऱ्या बाजूला पांडुरंगाची महापूजा करण्याचा थाट घालायचा हा काशासाठी?, असा सवाल कराडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

दरम्यान, वारकऱ्यांना अशी वागणूक दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महापूजा पांडूरंगाला मान्य होणार नाही. तसेच महापूजा करत असताना ब्राम्हणानं म्हटलेलं मंत्र देवाच्या डोक्यावर दगड लागल्याप्रमाणे लागतील, असंही काराडकर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

जिवंत असूनही अभिनेत्याच्या मृत्यूची अफवा; तक्रार केल्यानंतर मिळालं हे अजब उत्तर

‘100 रूपये द्या आणि माझ्यासोबत सेल्फी घ्या’; भाजप नेत्याची भन्नाट आयडिया

‘सेल्फ केअरच्या नावाखाली स्वत:चं नुकसान करतोय’; अमिर खानच्या मुलीने केला मोठा खुलासा

तिखट आणि धारदार प्रश्न विचारा, पण उत्तरं देण्याची संधी द्या- नरेंद्र मोदी

काँग्रेसचा मोठा निर्णय; पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर नवज्योतसिंह सिद्धू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More