बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यास चक्रीवादळाचं कव्हरेज करताना महिला पत्रकार ढसा ढसा रडली, पाहा व्हिडीओ

कोलाकात | भारताच्या पूर्व किनारपट्टीवर यास चक्रीवादळ येऊन धडकलं आहे. यासमुळे 6 राज्यात पश्चिम बंगाल, ओडिशा, तमिळनाडू, झारखंड आणि कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस येणार असल्याचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. ओडिशा पश्चिम बंगालसह तमिळनाडू कर्नाटकमध्ये मंगळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. किनारपट्टी भागात या वादळाचा मोठा धोका पाहायला मिळतो आहे.

या परिस्थितीतही यास वादळाबाबत सर्व माहिती सामान्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी पत्रकार रस्त्यावर उतरले आहेत. जीवाची बाजी लावून वेगवेगळ्या शहरांमध्ये यास चक्रीवादळाचं कव्हरेज पत्रकार करत आहेत. कोलकाता शहरात यास चक्रीवादळाचं कव्हरेज करताना एका कोलकात्यातील टीव्ही चॅनेलच्या महिला पत्रकाराची गाडी वाहून गेल्यानं मोठी खळबळ उडाली होती. गाडीत असणाऱ्या चालकाला इतर पत्रकारांनी वाचवलं. पण, यासचा अनुभव स्वत:च्या डोळ्यांनी अनुभवणं या टीव्ही चॅनेलच्या टीमसाठी धक्कादायक होतं.

घटनेनंतर या महिला पत्रकारानं एक फेसबुक लाइव्ह केलं आहे. ज्यामध्ये त्यांची टीम अक्षरश: धाय मोकलून रडत आहे. हा अनुभव मांडताना त्यांना रडू कोसळलं आहे. जवळपास मृत्यू डोळ्यासमोर पाहिल्यासारखा अनुभव या टीव्ही चॅनेलच्या टीमने अनुभवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अत्यंत तीव्र चक्रीवादळ यास बालासोरच्या दक्षिण पूर्वेस सुमारे 50 किमी अंतरावर आहे. दुपारपर्यंत हे चक्रीवादळ धामराच्या उत्तरेस आणि बालासोरच्या दक्षिणेस उत्तर ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारी भाग ओलांडेल. यावेळी वादळ तीव्र असेल असा अंदाज वर्तवला आहे. यावेळी ताशी 140 किमी वेगानं सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, भुवनेश्वरचं बीजू पटनायक इंटरनॅशनल विमानतळ आणि झारसुगुड़ा विमानतळ मंगळवारी रात्री 11 वाजता बंद करण्यात आलं होतं, ते गुरुवारी सकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दूर्गापूर आणि राउरकेला विमानतळावर देखील सगळी उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत. कोलकातामधील नेताजी सुभाष चंद्र बोस इंटरनॅशनल विमानतळ बुधवारी सकाळी 8:30 पासून संध्याकाळी 7:45 पर्यंत सगळी उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत. रेल्वेनं सुद्धा बंगाल-ओडिशामधील सर्व गाड्या रद्द केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ –

 

थोडक्यात बातम्या –

कडक सॅल्यूट! पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानाची पत्नी झाली लेफ्टनंट

केंद्र सरकारकडून दिलेल्या वेळेची मर्यादा आज संपुष्टात; ‘या’ समाज माध्यमांवर कारवाई होणार?

‘यास’ चक्रिवादळाचा ट्रेलर, ताशी 150 कि.मी वेगानं धडकण्याची शक्यता ; पाहा व्हिडीओ

कोरोनाची लस जगात सर्वात आधी घेणाऱ्या ‘विल्यम शेक्सपिअर’चा मृत्यू

माहेरी जाताना नवऱ्याला बाईक थांबवायला सांगितली, त्यानंतर तिने जे केलं त्याने सर्वच हादरले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More