बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नेहा धुपियाने दिली गोड बातमी, पुन्हा एकदा होणार आई

मुंबई | पाच बॉयफ्रेंड असणं ही मुलीची मर्जी, असं वक्तव्य केल्याने अभिनेत्री नेहा धुपिया काही दिवसांपूर्वी प्रचंड चर्चेत आली होती. त्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं हेतं. यानंतर आता नेहाने तिच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवरुन एक गोड बातमी दिली आहे. नेहा धुपिया पुन्हा एकदा आई होणार असल्याची बातमी नेहाने दिली आहे.

परिवारासोबत मॅटरनेटी फोटोशूट मधला एक फोटो शेअर करत नेहाने आपल्या आयुष्यातली गोड बातमी दिली आहे. नेहाला पहिली मुलगी आहे. नेहाने शेअर केलेल्या फोटोच्या कॅपशनमध्ये कॅपशन सुचवण्यासाठी दोन दिवस लागले आणि त्यानंतर एकच सुचलं थँक्यू देवा, असं तिने लिहलं आहे. नेहाने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा शाॅर्ट ड्रेस परिधान केला आहे. तसेच या फोटोमध्ये तिचं बेबी बम्प देखील दिसत असून या फोटोमध्ये तिचा पती आणि मुलगी देखील आहे.

नेहाच्या पतीचं नाव अंगद असं असून तो नेहा पेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. पहिल्या बाळाच्या वेळेस नेहा लग्नाआधीच गरोदर होती, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. लग्नाच्या केवळ सहा महिन्यानंतर नेहाने एका मुलीला जन्म दिला आणि तिचं नाव मेहरा असं ठेवण्यात आलं.

दरम्यान, नेहा लवकरच एका वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. या वेब सिरीजमध्ये ती कोपची भूमीका साकरणार असल्याची माहिती समोर आली आहे. नेहाचा पती अंगद हा देखील एक अभिनेता असून अखेरचा तो ‘गुंजन सक्सेनः द कारगिल गर्ल’ या चित्रपटात दिसला होता.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

थोडक्यात बातम्या-

“मी जगातील सर्व काश्मीरी नागरिकांचा ब्रँड अॅम्बेसिडर”

“फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा”

“2017 ला मुंबई तुंबली तेव्हा मुख्यमंत्री जबाबदार होते अन् 2021 मध्ये पाऊस”

“कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत”

मुसळधार पावसात जखमी बाप-लेकीच्या मदतीला धावले पोलीस, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More