बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलमानच्या ‘दबंग 3’ चित्रपटाला पायरसीचा फटका!

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘दबंग 3’ हा बहूचर्चित असणारा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवाने केले असून या चित्रपटात सलमान खान व्यतिरीक्त सोनाक्षी सिन्हा, डिंपल कपाडिया, सई मांजरेकर, आरबाज खान आणि सुदीप किच्चा यांनी प्रमुख भुमिका साकारल्या आहेत.

हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तो गाण्यांमुळे वादात होता.  या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 30 कोटींचा गल्ला जमवला होता, पण दुसऱ्याच  दिवशी पायरसी वेबसाईट तमिलरॉकर्सनं चित्रपटची ऑनलाईन एचडी प्रिंट एका लिंकच्या माध्यमातून लीक केल्यानं चित्रपटाच्या गल्ल्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

‘दबंग 3’ च्या कमाईचा आकडा  150  कोटींच्या पार जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. गुरुवारी या चित्रपटाने ऍडव्हांस बुकींगमध्ये 11.50 कोटींची कमाई केली होती, पण चित्रपट ऑनलाईन लीक झाल्यानं चित्रपटाच्या कमाईत  तोटा होऊ शकतो.

दरम्यान, तमिलरॉकर्सने फक्त ‘दबंग 3’ नव्हे, तर या आधीही अनेक बिग बजेट असणारे चित्रपट लीक केले होते.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More