बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टाटा मोटर्स लवकरच करणार सीएनजी कार लाँच; ‘ही’ असणार किंमत

नवी दिल्ली | सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांचा फायदा सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना झाला आहे. सीएनजी वाहनांची खरेदी अलिकडच्या काळात वाढली असून आता टाटा मोटर्सनेही याबाबत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. टाटा मोटर्स आता त्यांची हॅचबॅक कार ‘टियागो’ लवकरच सीएनजी व्हर्जनमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे.

सध्या सीएनजी कार्सला मिळणारा प्रतिसाद पाहून टाटा मोटर्सनेही सीएनजी कार लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा मोटर्सची हि पहिली सीएनजी कार असणार आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या कारच्या किमतीत आणि नवीन लाँच होत असलेल्या टियागो कारच्या किमतीत 60 हजार रुपयांचा फरक असणार आहे.

सध्याच्या टियागोची बेसिक शोरूम किंमत 4.99 लाखाच्या पुढे सुरू होतेय. तर टॉप व्हेरियंटची किंमत 7.05 लाखांपर्यंत आहे. ही गाडी मायलेजच्या बाबतीतही उत्तम असून टियागो कार प्रतिलीटर 24 ते 25 किलोमीटर धावते. मात्र सीएनजीवर बनवण्यात येणारी टियागो याहीपेक्षा उत्तम मायलेज देऊ शकणार आहे.

ही सीएनजी कार सध्याच्या पेट्रोलवरील कारपेक्षा वेगळी दिसावी, यासाठी कारमध्ये काही बदल केले जाणार आहेत. सीएनजी कारमध्ये नवीन बंपर, क्रोमसह नवीन फ्रंट ग्रिल, प्रोजेक्टर हेडलँप, एलईडी टेल लाईट्स, असे फिचर्स दिले जातील. याशिवाय टियागोमध्ये अॅपल कार प्ले, टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल असे बदल असणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘अमृता वहिनींना भाजपकडून आमदार व्हायचंय’, अमृता फडणवीसांना ‘त्या’ वक्तव्यावरून सडेतोड प्रत्युत्तर

लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वेने वसूल केला तब्बल एवढ्या कोटींचा दंड

SBI नंतर आता पेटीएम पेमेंट्स बँकेला RBI चा दणका; केली ‘ही’ मोठी कारवाई

‘…नाहीतर हे आयुष्यभराचं ग्रहण असतं’, धनंजय मुंडेंनी सांगितली मन की बात

“शिवसेना सोडणाऱ्यांच्या यादीत पहिलं नाव रामदास कदम यांचं होतं”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More