बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सीरमला लागलेल्या आगीत एक हजार कोटींचं नुकसान झालं- आदर पुनावाला

पुणे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सीरमच्या आग लागलेल्या नव्या इमारतीची पाहणी केली. यावेळी सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी उद्धव ठाकरेंना झालेल्या नुकसानासंदर्भात माहिती दिली.

सीरमला लागलेल्या आगीत एक हजार कोटींचं नुकसान झालं आहे. इमारतीतील साहित्य जळून खाक झालं आहे. बीसीजी लस आणि रोटाव्हायरसचंही मोठं नुकसान झालं आहे, अशी माहिती आदर पुनावाला यांनी दिली आहे.

आगीत कोरोना लसीचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. लस सुरक्षित आहेत, असं आदर पुनावाला यांनी सांगितलं आहे.

कोव्हिशिल्ड लस दुसऱ्या ठिकाणी होती. त्यामुळे या लस सुरक्षित आहेत. तसेच या लसीच्या उत्पादनावरही कोणताही परिणाम झालेला नाही. ज्या ठिकाणी आग लागली तिथे कोणत्याही व्हॅक्सिनची निर्मिती होत नव्हती. केवळ भविष्यात या ठिकाणी लस ठेवण्यासाठी या इमारतीचं काम सुरू होतं, असं पुनावालांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

सीरमच्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल- उद्धव ठाकरे

“आमची भीती खरी ठरली, गंभीर विषय सत्तेच्या शक्तीसमोर दाबण्याचा प्रयत्न तर झाला नाही??”

मला माझ्या घरातील माणसांची नावं खराब करायची नाहीत, म्हणून मी तक्रार मागे घेते- रेणू शर्मा

“पुढच्यावेळी महाविकास आघाडीला बहुमत मिळताना मारामार अन् काँग्रेसला स्वबळावर सत्तेची स्वप्नं पडत आहेत”

‘राष्ट्रवादाचं सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश झाला’; सोनिया गांधींची अर्णब गोस्वामींवर टीका

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More