बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रुपाली ठोंबरेंच्या राजीनाम्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पुणे | पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या धडाकेबाज महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombre Patil) यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. त्यांच्या राजीनाम्यानं सगळ्यांना धक्काच बसला आहे. रुपाली पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आता मनसेनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्वीट करत रुपाली ठोंबरेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील। जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’,” असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे, असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजीनाम्यानंतर रुपाली ठोंबरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे रुपाली ठोंबरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, पाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. या पत्रात त्यांनी लिहिलं होतं की, सप्रेम जय महाराष्ट्र, मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद आणि मा.”श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल. जय महाराष्ट्र.

 

थोडक्यात बातम्या – 

लग्नानंतर विकी-कतरिना पहिल्यांदाच मिडियासमोर, विककॅटच्या लूकनं वेधलं लक्ष

अखेर अभिनेत्री अंकिता लोखंडे अडकली लग्नबंधनात, पाहा व्हिडीओ

रूपाली ठोंबरेंचा मनसेला दे धक्का; लवकरच ‘या’ नव्या पक्षात करणार प्रवेश

राज्यात Omicron चा धोका वाढला; ‘या’ ठिकाणी सापडले आणखी 8 रुग्ण

मोदींवर टीका करताना अमोल मिटकरींची जीभ घसरली, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More