बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे उमेदवार नाहीत, उपरे आणावे लागतात”

मुंबई | आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तासभर विविध मुद्द्यावरून भाष् केलं आहे. राज्यातील गल्लीपासून देशाची राजधानी दिल्ली पर्यंत सर्व क्षेत्रावर उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधून घेतलं आहे. महिला, शेतकरी, राष्ट्र, धर्म, जात यांच्यापलिकडे जात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा आपलं मत मांडलं आहे.

भाजपवर आपल्या खास शैलीत ठाकरे यांनी टीका केली आहे. भाजपमध्ये 2019 पासून बाहेरच्या पक्षातून आलेल्यांची संख्या वाढली आहे. यावरच उद्धव ठाकरे यानी लक्ष वेधलं आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे उमेदवार नाहीत, उपरे आणावे लागतात, अशी जहरी टीका भाजपवर ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आता ईडी आणि सीबीआयची भीती वाटत नाही, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

थोडक्यात बातम्या 

“आमचं आजही आव्हान आहे हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा”

“हरहर महादेव हे दिल्लीच्या तख्ताला दाखवून देण्याची वेळ”

शिवसेनेचा आवाज दाबणारा जन्माला यायचाय- उद्धव ठाकरे

“कोरोना ‘ना स्त्री, ना पुरूष’ अशा मनोवृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे”

”पंकजा मुंडेंचे हेलिकॅाप्टर फिरलं नाही तर कोणी आमदार खासदार होत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More