औरंगाबाद | शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा होत आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंची सभा होत आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना भाजपवर जोरदार टीका केली आहे.
मुख्यमंत्री पद सांभाळणे तेही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सोप नाही. जे वैरी होते ते मित्र झाले आहेत. ज्या शिवसेना प्रमुखांनी तुमच्या नेत्यांना वाचवलं आहे. ती शिवसेना तुमच्या डोळ्यात खुपायला लागली आहे. इतकी वर्षे ज्यांनी तुम्हाला जोपासलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
2 लाखांपर्यंत कर्ज आपल्या महाविकास आघाडी सरकारने माफ केलं आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अशा योजना आणत आहे की, शेतकरी घाबरला पाहिजे योजनेचा लाभ घ्यायला. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावर आम्ही बांधावर जातो. आम्ही जे आहोत शेतकऱ्यांना बांधिल आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
निवडणुका आल्यानंतर नको त्या खपल्या काढायच्या. धर्माच्या नावावर अफूची गोळी देतात. देशातील सर्व पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांना बोलवा आणि कोणत्या मुद्यावर बोलायचं ते सांगा, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली. पेट्रोलचे दर एवढे वाढावायचे आणि आक्रोश झाल्यावर कमी करायचे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. महाराष्ट्रातल्या मुलामुलींना इतर राज्यामध्ये रोजगारासाठी जाण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकार काम करत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, काश्मिरी पंडितांसाठी शिवसेना प्रमुखांना पुत्र आणि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राज्यात येण्याचं आवाहन केलं आहे. आज महागाई वाढत आहे कोणी ब्र अक्षर काढायला तयार नाही. शिवसेनेशिवाय भाजपमध्ये भारत बंद करण्याची ताकद नाही. काही गणपती दिड दिवसाचे गणपती असतात, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. काही वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयींनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले तेव्हा बैलगाडीवर बसून गेले होते. तो भाजपा आता कुठे आहे?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
थोडक्यात बातम्या-
“भाजपने आपल्या बेलगाम प्रवक्त्यांच्या डोक्यात अक्कल घालावी”
हिंदुत्व हा आमचा श्वास, हिंदुत्व हे आमच्या धमन्यांमध्ये आहे- उद्धव ठाकरे
काँग्रेसकडून ‘या’ दोन नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर
‘नापास झालो तर बिल्डींगवरून उडी मारेन’ मित्रांना चेष्टेत बोलला पण निकाल पाहताच उचललं टोकाचं पाऊल
मोठी बातमी! मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
Comments are closed.